राहुल गांधींचे मूळ आडनाव हे 'खान'; अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा

राहुल गांधींचे मूळ आडनाव हे 'खान'; अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा

पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केली.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

महेश महाले | नाशिक : कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे खरंच गांधी आहेत का? त्यांचे मूळ नाव 'खान' असल्याची टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली आहे. ते १५ ऑगस्ट निमित्त नाशिकच्या मालेगाव येथे भारतीय विचार मंचातर्फे प्रबोधन व जनजागृतीसाठी वीर सावरकरांच्या जीवनावरील व्याख्यानाप्रसंगी बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टीका केली.

राहुल गांधींचे मूळ आडनाव हे 'खान'; अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे सैनिक आक्रमक; कंत्राटदारचे फोडले कार्यालय

काय म्हणाले शरद पोक्षें?

एक तर तू गांधी नाही अन् सावरकर पण नाही. हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहेत. महात्मा गांधीचे वंशज नाही तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला, फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याचा यांचा इतिहास असल्याचा आरोप शरद पोंक्षे यांनी केला. या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहित नाही तर यांना सावरकरांचा कसा माहित असणार, अशा शब्दात शरद पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानात टीका केली. राफेल प्रकरणात सुध्दा यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली. जोपर्यंत अपील करण्याची संधी आहे तोपर्यंत हे न्यायालयात माफी मागत असतात. सावरकर प्रकरणात हेच झाले, असेही पोंक्षे यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com