Shashank Ketkar झाला दुसऱ्यांदा बाबा, काय ठेवलं मुलीचं नाव?
झी मराठीवरील 'होणार सून मी या घरची' मालिकेच्या माध्यमातून 'श्री' म्हणजेच शंशाक केतकर हा घराघरांत जाऊन पोहचला. मालिकेमध्ये सात महिलांना सांभाळणारा असा हा श्री म्हणजेच शशांक केतकर तरूणींच्या गळ्यातील ताईत झाला होता. शंशाकने अनेक भूमिका साकारल्या. सध्या तो मुरंबा मालिकेत काम करत आहे. शंशाकने त्याच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. त्याच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे.
मराठी सिनेसृष्टीमध्ये एक यशस्वी अभिनेत्यांमध्ये शंशाक केतकर हे नाव येत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची माहिती समोर आली होती. शंशाकने त्याची पत्नी प्रियांकाचे मॅटर्निटीचे फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आणि तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. चाहत्यांमध्ये शंशाकला मुलगी होणार की मुलगा यांची उत्सुकता होती. अखेर शंशाकच्या घरी लक्ष्मी जन्माला आली आहे.
काय आहे शंशाकच्या मुलीचे नाव?
२०१७ मध्ये शंशाक त्याची मैत्रीण प्रियांका ढवळे हीच्या सोबत लग्नबंधनात अडकला. त्यांना २०२१ मध्ये मुलगा झाला आणि त्याचे नाव त्यांनी ऋग्वेद ठेवले. त्यानंतर आता शंशाकने इंस्टाग्राम स्टोरी टाकली होती. त्या स्टोरीमध्ये एका कुंटुबाचे चित्र होते त्या चित्रावर त्यांने त्यांच्या कुंटुबातील लोकांची नावे लिहीले आहेत. त्याच चित्रावर त्याने 'हम दो हमारे दो' म्हणत शंशाकने त्यांच्या मुलीचे नाव 'राधा' ठेवल्याचं जाहीर केलं आहे.
शंशाकने इंस्टाग्रामवर पोस्ट करत 'आता खऱ्या अर्थाने कुटुंब पुर्ण झालं घरी लक्ष्मी आली' असा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि या पोस्टच्या कॅप्शनमध्ये राधा असं लिहित मुलीचे नाव जाहीर केले आहे. शंशाक सध्या स्टार प्रवाहवरील 'मुरंबा' या मालिकेमध्ये प्रमुख नायकाची भूमिका साकारत आहे. तर प्रियांका ही व्यवसायाने वकिल आहे.