Shehnaaz Gill झाली भावूक, सिद्धार्थचे नाव घेतले आणि म्हणाली- 'ही फक्त माझी मेहनत आहे...'

Shehnaaz Gill झाली भावूक, सिद्धार्थचे नाव घेतले आणि म्हणाली- 'ही फक्त माझी मेहनत आहे...'

'बिग बॉस 13' फेम पंजाबमधील कतरिना कैफ शहनाज गिलला घरोघरी ओळख मिळाली आहे. गेल्या 3 वर्षात शहनाज गिलच्या लोकप्रियतेत बरीच वाढ झाली आहे.
Published by :
shweta walge
Published on

'बिग बॉस 13' फेम पंजाबमधील कतरिना कैफ शहनाज गिलला घरोघरी ओळख मिळाली आहे. गेल्या 3 वर्षात शहनाज गिलच्या लोकप्रियतेत बरीच वाढ झाली आहे. शहनाजने अल्पावधीतच लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सोशल मीडियावर शहनाजचे वर्चस्व असले तरी आता तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सिद्धार्थ शुल्काची आठवण काढताना दिसत आहे.

चाहते आता शहनाज गिलच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत. आता एका अवॉर्ड शोमधून शहनाज गिलचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या यशाचे श्रेय दिवंगत सिद्धार्थ शुक्लाला देताना दिसत आहे. खरं तर, अलीकडेच फिल्मफेअर मिडल ईस्ट आर्चर्स अवॉर्ड्स आयोजित करण्यात आले होते ज्यात शहनाजला बॉलीवूडचा रायझिंग स्टार पुरस्कार देण्यात आला होता. यादरम्यान शहनाज स्टेजवर म्हणते की- 'मी यासाठी माझे कुटुंब, मित्र आणि माझ्या टीमचे आभार मानणार नाही, कारण हे माझ्या मेहनतीमुळे झाले आहे.' पुरस्काराकडे पाहून शहनाज म्हणते- 'तू माझी आहेस, माझीच राहणार. यानंतर शहनाज म्हणते- 'पण मला एका माणसाचे आभार मानायचे आहेत. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. सिद्धार्थ शुक्ला धन्यवाद, हे तुमच्यासाठी आहे.

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची 'बिग बॉस 13' दरम्यान मैत्री झाली होती. चाहत्यांना ही जोडी इतकी आवडली की लोक या जोडप्याला 'सिडनाज' नावाने हाक मारायला लागले. एवढेच नाही तर चाहत्यांना दोघांनाही लग्नाच्या बंधनात बघायचे होते.मात्र, अभिनेत्याच्या निधनानंतर चाहत्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. चाहते आजही दोघांच्या प्रेमाची उदाहरणे देतात. आता ज्यांना सिडनाजची जोडी आवडते ते या व्हिडिओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. शहनाज गिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायच झालं तर, ती लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. पंजाबची कतरिना कैफ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात सलमान आणि शहनाजशिवाय पूजा हेगडेही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Shehnaaz Gill झाली भावूक, सिद्धार्थचे नाव घेतले आणि म्हणाली- 'ही फक्त माझी मेहनत आहे...'
करण आणि तेजस्वीने दुबईत खरेदी केले घर, किंमत कोट्यवधींच्या घरात
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com