‘रात्रीस खेळ चाले’ मालिका शेवंताने का सोडली? समोर आले कारण

‘रात्रीस खेळ चाले’ मालिका शेवंताने का सोडली? समोर आले कारण

Published by :
Published on

झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' च्या शेवंता या पात्राने चाहत्यांना विशेष भुरळ घेतली. मात्र शेवंताने अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने मालिका सोडली आणि प्रेक्षकांना धक्काच बसला.

शेवंता हे पात्र एका उंचीवर घेऊन गेल्यानंतर अपूर्वाने मालिका का सोडली? असा प्रश्न सर्वांनाच पडला. मात्र आता मालिकेतील शेवंता का बदलली? याचं कारण समोर आले आहे.शेवंता या व्यक्तिरेखेसाठी अपूर्वाने तिचे 10 किलो वजन वाढवले होते. तिच्या वाढलेल्या वजनावरुन सोशल मीडियावर तिला अनेक निगेटिव्ह कमेंट्स येत होत्या. त्या कमेंट्स ती फेस करत होती.

मात्र मालिकेच्या सेटवर देखील काही नवख्या आणि ज्येष्ठ कलाकारांकडून तिची खिल्ली उडवण्यात आली आणि त्यामुळेच अपूर्वाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तिने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. 'मालिकेच्या सेटवर काम करताना नवख्या कलाकारापासून ते ज्येष्ठ कलाकारांनी माझ्या वाढलेल्या वजनावर माझे विडंबन करत माझी खिल्ली उडवली. वरिष्ठांनी त्यावर कारवाई केली तरी देखील नव्या कलाकारांनी साधी दिलगिरी देखील व्यक्त केली नाही, असे अपूर्वाने म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com