shilpa shetty | “मी चूक केली पण ते ठीक आहे.” शिल्पा शेट्टीचे सुचक विधान

shilpa shetty | “मी चूक केली पण ते ठीक आहे.” शिल्पा शेट्टीचे सुचक विधान

Published by :
Published on

'सुपर डान्सर 4' परिक्षक (Judge) शिल्पा शेट्टीने (shilpa shetty) तिच्या इन्स्टाग्रामवर चुकांबद्दल बोललेल्या एका पुस्तकाचा फोटो शेअर केला. पहिल्या पानावर सोफिया लॉरेनचं वाक्य होते.ज्यामध्ये असे लिहिले होते, "चुका हा संपूर्ण आयुष्यासाठी देय असलेल्या थकबाकीचा भाग आहे."

चुकांबद्दल बोलताना, त्यात लिहिले आहे की , "चुका केल्याशिवाय व्यक्ती आयुष्यात घडत नाही". आशा आहे की त्या चुका इतर लोकांना दुखावणाऱ्या चुका होणार नाहीत. त्यात पुढे असेही म्हटले की , "चुका केल्यावर त्या गोष्टी विसरू शकतो किंवा आव्हानात्मक आणि उत्तेजक अनुभव म्हणून पाहू शकतो. स्वतःच्या चुकांमुळे नव्हे तर त्यातून मिळालेल्या अनुभवातून स्व:ताला घडवणार.

"मी पुढे चुका करणार आहे. मी स्वतःला क्षमा ही करीन आणि त्यातून शिकेन ही," असे शिल्पा म्हणाली. तसेच तिने तिच्या पोस्ट वर एक अॅनिमेटेड स्टिकर जोडले आहे. ज्यावर लिहिले होते, "मी चूक केली पण ते ठीक आहे." या पोस्टमुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे की शिल्पा नक्की कोणत्या चुकीचा उल्लेख करत आहे. तसेच ती राज कुंद्रा (Raj kundra) कडे इशारा करत आहे का? अशा प्रश्न नेटकर्यांना पडला.

पोर्नोग्राफी (Pornography) प्रकरणात राजला 19 जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले होते. अटकेदरम्यान या गुन्ह्यात शिल्पा शेट्टीची कोणतीही सक्रिय भूमिका नसल्याचे पोलिसांनी तपासानंतर स्पष्ट केले. त्यामुळे शेवटच्या वेळी प्रियदर्शन दिग्दर्शित 'हंगामा 2' चित्रपटात दिसली होती. मात्र आता अभिनेत्री सोनी टीव्ही (Sony TV)चा लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोची जज म्हणून परतली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com