Shivpratap Garudjhep Teaser : ‘शिवप्रताप- गरुडझेप’चा टीझर प्रदर्शित; डॉ अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

Shivpratap Garudjhep Teaser : ‘शिवप्रताप- गरुडझेप’चा टीझर प्रदर्शित; डॉ अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि हे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. अशाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे,
Published by :
Siddhi Naringrekar

मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि हे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. अशाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे, ‘गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep Teaser )असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याच्या सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे.

जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. सप्टेंबर २०२२मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

हा टीझर शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘शिवप्रताप- गरुडझेप… (Shivpratap Garudjhep Teaser ) सप्टेंबर २०२२ ला चित्रपटगृहात…जय शिवराय! हर हर महादेव…’ या टीझरमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. “३५६ वर्षांपूर्वी हाच आग्र्याचा लाल किल्ला थरारला होता. मुघलशाही हादरली होती. कारण याच वास्तूमध्ये पेटलं होतं मराठी स्वाभिमानाचं स्फुलिंग. पूर्ण हिंदुस्तानानं अनुभवला होता हा शिवप्रताप”

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com