Shradha Kapoor : श्रद्धाचा हॉटनेस होतोय सोशल मीडियावर व्हायरल...
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांची मने जिंकली आहेत. याशिवाय तिचा फॅशन सेन्स देखील सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड ठरत असतो. श्रद्धा अनेकदा तिच्या ग्लॅमरस लूकमध्ये दिसते. अशा परिस्थितीत अभिनेत्रीचा बिकिनी अवतार क्वचितच पाहायला मिळतो. मात्र सध्या तिचे एक न पाहिलेले छायाचित्र इंटरनेटवर फिरत आहे. खरंतर श्रद्धा कपूर सध्या लव रंजनच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मॉरिशस आणि स्पेनमध्ये झाले आहे. जिथून काही दिवसांपूर्वी अनेक झलक समोर आली होती. यापैकी एका ताज्या फोटोमध्ये अभिनेत्रीचा बिकिनी अवतार पाहायला मिळत आहे.
हा लूक रिलीज झाल्यापासून चाहते श्रद्धाचे कौतुक करत आहेत. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की श्रद्धा कपूर एका बीचवर पिंक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. क्रू मेंबर्स देखील अभिनेत्रीच्या आजूबाजूला दिसत आहेत आणि बीच लोकेशनवर चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. श्रद्धापूर्वी रणबीर कपूरचा शर्टलेस लूकही व्हायरल झाला होता. चित्रपटासाठी शूट करण्यात आलेल्या खास गाण्यामधील ही छायाचित्रे असल्याची माहिती समोर येत आहे.
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. लव रंजनच्या या शीर्षक नसलेल्या चित्रपटात बोनी कपूर आणि डिंपल कपाडिया देखील दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी होळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.