Shrutii Marrathe: श्रुती मराठेला लागली बाप्पाच्या आगमनाची आस; शेअर केला 'हा' व्हिडीओ

Shrutii Marrathe: श्रुती मराठेला लागली बाप्पाच्या आगमनाची आस; शेअर केला 'हा' व्हिडीओ

ढोल पथकांमध्ये नेहमीच दिसणारा एक अतिशय गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे
Published by  :
Team Lokshahi

महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजेच गणपती बाप्पांचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. बाप्पांचं स्वागत दणदणीत व्हावं, यासाठी महाराष्ट्रातील लहान- मोठ्या सगळ्याच शहरातील ढोल पथकं मागील महिना भरापासून कसून सराव करत आहेत. ढोल पथकांतील प्रत्येक सदस्याकडे असा काही उत्साह असतो की तो नकळतपणे ढोलवादन बघणाऱ्याच्याही अंगात शिरतो आणि मग ढोल- ताशांच्या तालावर बघणाराही आपोआप थिरकू लागतो.

ढोल पथकांमध्ये नेहमीच दिसणारा एक अतिशय गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे. श्रुतीने नुकताच तिचा ढोल वादनाची प्रॅक्टिस करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. श्रुती उत्तम वादक असून ती दरवर्षी बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन ढोल-ताशा वाजवते.

हा व्हिडिओ पाहून चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. आपला बाप्पा येणार आणि त्याची तयारी देखील सुरू झालीये हे पाहूनच अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्यात ढोलताशाचा आवाज अनेकांना त्याच्या तालावर डुलायला भाग पाडतोय. श्रुतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पुण्यातील एनएमव्ही हायस्कुल येथे खास कलाकारांसाठी असलेल्या 'कलावंत' या ढोलताशा पथकाची प्रॅक्टिस केली जाते. त्यात श्रुती स्वतः कमरेला ढोल बांधून सराव करताना दिसतेय. या पथकात अनेक श्रुतीसह कलाकार ढोल वाजवण्यासाठी दरवर्षी सहभागी होतात. त्यात सौरभ गोखले, तेजस्विनी पंडित यांचाही समावेश आहे. श्रुतीने पथकासोबत सरावा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती खूप आनंदाने आणि ताकदीने ती सराव करताना दिसतेय. तिथे उपस्थित सगळेच प्रचंड उत्साही आहेत .श्रुतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com