Shubman Gill Sara Tendulkar : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर करतायत डेट? व्हिडिओ आला समोर

Shubman Gill Sara Tendulkar : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर करतायत डेट? व्हिडिओ आला समोर

शुभमन गिल हा वेगवेगळ्या कारणानं नेहमी चर्चेत असतो.
Published by :
Siddhi Naringrekar

शुभमन गिल हा वेगवेगळ्या कारणानं नेहमी चर्चेत असतो. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन अनेक चर्चा होत असतात. साराचा वर्ल्डकप सामन्यादरम्यान शुभमन गिलला चिअर अप करताना व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

यातच आता पुन्हा एकदा शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आता ही दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या व्हिडिओमध्ये शुभमन गिल आणि साराला एकत्र पाहण्यात आलं. सारा ही तिच्या इतर मित्रांशी बोलताना देखिल दिसत आहे. त्यामुळे आता शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर हे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com