विजय सेतूपतीसोबत झळकणार सिध्दार्थ जाधव; नव्या चित्रपटाची घोषणा

विजय सेतूपतीसोबत झळकणार सिध्दार्थ जाधव; नव्या चित्रपटाची घोषणा

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चित्रपटाचे टीझर रिलीज

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. यानिमित्त एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'गांधी टॉक्स' असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेलेकर आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून विशेषतः म्हणजे यातील तगडी स्टारकास्ट आहे. टीझरमध्ये विजय सेतुपती आणि अरविंद स्वामी तसेच अदिती राव हैदरी झळकणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये मराठमोळा सिध्दार्थ जाधव झळकणार आहे.

या चित्रपटाचे नाव 'गांधी टॉक्स' असू शकते. पण, त्यात कोणीही बोलणार नाही कारण हा मूकपट आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात मोठे नायक असलेले महात्मा गांधी यांचे जीवन आणि तत्त्वे हे केवळ मानवासाठीच नव्हे तर समाज आणि देशाच्याही उन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या मंत्रासारखे आहेत. पण मोठी गंमत म्हणजे बदलत्या काळानुसार लोकांनी गांधींच्या शिकवणीकडे पाठ फिरवली, पण नोटांवर छापलेला गांधींनाच आपला मार्गदर्शक बनवले. 'गांधी टॉक्स'ची कथा अशाच एका ग्रे शेडमध्ये बेतलेली दिसते. चार पात्रांच्या हातात भरपूर पैसा आहे आणि गांधीजींची वेगवेगळी माकडंही या चौघांसोबत दिसतात. अरविंद स्वामी हा डोळे मिटून 'वाईट पाहू नका' असा संदेश देणारा माकड आहे. तर सिद्धार्थ जाधवसोबत 'वाईट ऐकू नका' आणि आदितीसोबत 'वाईट बोलू नका' असा संदेश देणारी माकडं आहेत.

परंतु, 'गांधी टॉक्स'मध्ये विजय सेतुपतीच्या पात्रासह दिसणारे माकड हा गाजावाजा करणारा आहे. टीझरमध्येही त्याच्यासमोर बरेच पैसे दिसत आहेत आणि तो गुपचूप खेळण्यामध्ये लपवताना दिसत आहे. म्हणजेच, कथा कदाचित अशी आहे की सेतुपतीचे पात्र या तीन पात्रांशी पैशाच्या प्रकरणात अडकणार आहे, किंवा त्यांना अडकवणार आहे. कदाचित विजय सेतुपती 'गांधी टॉक्स'मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

'गांधी टॉक्स'च्या चित्रपट 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हे हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि मराठी भाषेत रिलीज करण्याची निर्मात्यांची योजना आहे. हा चित्रपट केवळ गांधीच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांचीही जयंती साजरी करणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला 108 वर्षे पूर्ण होत असताना, 'गांधी टॉक्स'चे दिग्दर्शक किशोर बेलेकर यांनी दादासाहेबांना हा चित्रपट समर्पित केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, अशा प्रकारचा हा प्रयोग टीझरमध्ये खूपच मजेदार दिसत आहे. या सिनेमाचे चाहते नक्कीच या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com