ठरलं! 'या' दिवशी वाजणार सिद्धार्थ अन् कियाराच्या लग्नाचा बॅण्ड

ठरलं! 'या' दिवशी वाजणार सिद्धार्थ अन् कियाराच्या लग्नाचा बॅण्ड

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते.
Published on

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. 'शेरशहा चित्रपटांमध्ये या जोडीने असंख्य प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. मागील काही दिवसांपासून या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.

त्यांच्या लग्नाबाबतच्या गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियारा 6 फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार ते जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम हे 5 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 8 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे लग्न होणार असल्याची माहिती समोर येताच सिद्धार्थ कियाराचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. लग्नात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com