Pankaj Tripathi
Pankaj TripathiTeam Lokshahi

OTT बद्दल मत व्यक्त करत पंकज त्रिपाठी बोलले असं काही....

ओटीटीमुळे कलाकार म्हणून लोकांचा संघर्षही बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं....
Published by :

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म हा बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांना चांगलीच स्पर्धा देत आहे. बहुतांश कलाकारही या प्लॅटफॉर्मवर आपली ताकद आजमावत आहेत. कारण OTT ची लोकप्रियता सर्वाधिक आहे. काळाच्या ओघात एक नवीन आणि वेगळी कथाही यामध्ये पाहायला मिळत आहे. OTT मुळे कलाकारांना सहजपणे काम मिळत आहे. प्रत्येक लहान-मोठा कलाकार हा सध्याच्या घडीला याच माध्यमातून पुढे येत आहे. तुम्ही पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांना बर्‍याच चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. त्यांनी काम केलेल्या बहुतांश चित्रपटात त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. वेगवेगळ्या सिरीजच्या माध्यमातून किंवा चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलेले आहे.

Pankaj Tripathi
Mahesh Babu : दाक्षिणात्यसह बॉलिवूडमध्येही महेशबाबूंचा चेहरा झळकणार ?

​पंकज त्रिपाठी म्हणाले की 'ओटीटीचा एक मोठा फायदा असा की तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. जर 8 भागांची मालिका असेल तर लेखकांची सर्व पात्रे आणि सब प्लॉट्समध्ये गुंतवणूक केली जाते. तर यासोबतच तुम्हाला दोन एपिसोड्सचे कॅरेक्टरही आठवतील कारण त्यात 10 सीन्स असतात. जर ओटीटी प्लॅटफॉर्म आधी असते तर माझे अभिनयाचे दुकान मी आधी उघडले असते आणि आता ते शोरूम झाले असते असा देखील त्यांनी विनोद केला. पंकज त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार ओटीटीमुळे कलाकार म्हणून लोकांचा संघर्षही बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.

Pankaj Tripathi
Alia Bhatt : कुटुंबीयांसाठी वेळ देत अलियाने केली धमाल....
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com