Sonali Bendre
Sonali BendreLokshahi Team

Sonali Bendre : सोनाली करणार OTT वर पदार्पण?

सोशल मीडियावर सोनालीच्या ओटीटी पदार्पणाबद्दल चर्चेला उधाण....
Published by :
Published on

बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री सोनाली बेंद्रे ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. विनय वैकुल (Vinay Vaikul) दिग्दर्शित 'द ब्रोकन न्यूज' या वेब सिरीजद्वारे सोनाली ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ही सिरीज 'प्रेस' या ब्रिटीश मालिकेची हिंदी रिमेक असेल. ज्यामध्ये सोनाली बेंद्रे न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिरिजचं कथानक मीडिया आणि वृत्तवाहिन्यांच्या कार्यशैलीवर आधारित असेल. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोनालीने तिचा 'सरफरोश' चित्रपट आणि तिचा को-स्टार आमिर खानबद्दलही बोलले. त्याने सांगितले की, 'सरफरोश'च्या शूटिंगदरम्यान आमिर खानकडून शिकण्याची संधी गमावली.

Sonali Bendre
Mahima Chaudhry : महिमा यांचे चित्रपटसृष्टीमध्ये पुनरागमन

सोनाली बेंद्रे म्हणाली की, मी आमिरसोबत 'सरफरोश' हा चित्रपट केला तेव्हा मी बऱ्याच गोष्टी शिकण्यात निष्काळजीपणा केला होता. 'सरफरोश'च्या वेळी त्यांच्याकडून शिकण्याची संधी मी गमावली आहे. ती पुढे म्हणाली की, जर मी ओटीटी प्लॅटफॉर्म आले नसते तर मला दुसरी इनिंग मिळाली नसती.

सोनाली बेंद्रे वेब सीरिजची मालिका 10 जूनपासून OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रीमियर होईल. त्याचा टीझर आणि ट्रेलर दोन्ही सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले असून यालाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेत सोनाली बेंद्रेसोबत जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराना आणि किरण कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Sonali Bendre
सोनाली बेंद्रेचा पाहिलाय का नवा लुक; सोळा वर्षांपूर्वीचा घातलाय तिने सूट
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com