Anil Kapoor | Sonam KapoorTeam Lokshahi
मनोरंजन
'सोनम, तुझ्याशिवाय आमचे घर रिकामे वाटते' लेकीच्या वाढदिवशी अनिल कपूर भावूक
अभिनेत्री सोनम कपूरचा आज 38 वा वाढदिवस...
अभिनेत्री सोनम कपूरचा आज 38 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते सर्वच स्थरावरून शुभेच्छा देत आहेत. त्यात विशेष म्हणजे तिचे वडील अभिनेता अनिल कपूर यांनी अतिशय प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल कपूर यांनी लिहिलेली पोस्ट तुमच्या मनाला नक्की भिडेल. सोनम सध्या लंडनमध्ये आहे आणि तिला किती मिस करत आहे हे व्यक्त करत अनिल कपूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
तुझ्याशिवाय आमचे घर रिकामे वाटते...
माझ्या हृदयाचा एक मोठा तुकडा लंडनमध्ये आहे आणि आज मला तिची आठवण येत आहे… सोनम, तुझ्याशिवाय आमचे घर रिकामे वाटते. तुझी, आनंद आणि माझा आवडता वायू यांची आठवण येते. माझ्या अप्रतिम मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्याबद्दल बरंच काही आहे ज्याची मला दररोज भीती वाटते! लवकर परत ये!!! तुझ्यावर प्रेम आहे! अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.