Tiger 3: लवकरच टायगर 3 प्रेक्षकांच्या भेटीला ; या दिवशी होणार रिलीज

Tiger 3: लवकरच टायगर 3 प्रेक्षकांच्या भेटीला ; या दिवशी होणार रिलीज

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांचा टायगर 3 हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत यशराज फिल्म्सकडून आज आज घोषणा करण्यात आली.
Published by  :
Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांचा टायगर 3 हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. टायगर 3 च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘टायगर 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. इतकेच नाही तर निर्मात्यांनी हेही जाहिर केले की, टायगर 3 हा फक्त हिंदी भाषेतच नव्हे तर हिंदीसोबतच तामिळ आणि तेलगू भाषेतही रिलीज होणार आहे. सलमान खानने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटातील लूक आणि रिलीज डेट चित्रपटाची जाहिर केलीये. यात कटरिना आणि सलमान खान त्यांच्या ‘टायगर’ अंदाजात दिसत आहेत. सलमान आणि कटरिनाचा हा खास लूक आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

'आ रहा हू" टायगर 3 दिवाळीत हा चित्रपट येतोय, असं कॅप्शन देत सलमान खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केला आहे.

मर्यादा नाही. भीती नाही. मागे वळून पाहणार नाही, असं कॅप्शन देत कटरिना कैफने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com