Stranger Things season 5 episode 9 update
STRANGER THINGS SEASON 5 EPISODE 9 RUMOURS: WAS THE ENDING FAKE?

Stranger Things season 5 episode 9 update: नेटफ्लिक्सवर ‘Stranger Things’चा आणखी एक एपिसोड? शेवट खोटा होता का, Vecna चा मास्टरप्लॅन अजूनही रहस्यमय

Netflix Trending: सिक्रेट एपिसोड, इलेव्हनच्या कमबॅकची शक्यता आणि वेकनाच्या फॉल्स रिअॅलिटी थिअरीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

नेटफ्लिक्सवर गाजलेल्या ‘स्ट्रेंजर थिंग्स’ या वेब सिरीजचा शेवटचा पाचवा सिझन नुकताच दोन टप्प्यात रिलीज झाला असून, चाहत्यांमध्ये त्याच्या अंताची जोरदार चर्चा रंगली आहे. अखेरीस ३१ डिसेंबरला शेवटचा एपिसोड प्रदर्शित झाला, पण त्यातील इलेव्हन ही लोकप्रिय पात्र मित्रांपासून दुरावल्याचं दृश्य चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेलं. हा शेवट अनेकांना पचनी पडला नाही, त्यामुळे सोशल मीडियावर सिक्रेट एपिसोडची अफवा पसरली असून, इलेव्हनच्या कमबॅकची थिअरी जोर धरत आहे.

सिरीजचा शेवटचा एपिसोड पाहिल्यानंतर चाहते निराश झाले. सुरुवातीला ७ जानेवारीला एक सिक्रेट एपिसोड येईल, असं सांगितलं जात होतं. मात्र नेटफ्लिक्सने स्पष्ट केलं की, पाचव्या सिझनचा आठवा एपिसोड हाच खरा शेवट आहे. तरीही सोशल मीडियावर चर्चा थांबली नाही. शेवटच्या भागात माईकने इलेव्हन जिवंत असल्याची शक्यता बोलून दाखवल्यानं चाहत्यांनी हा धागा पकडला. व्हिलन वेकनाने शेवटच्या लढाईत फॉल्स रिअॅलिटीचं जाळं विणलं असावं आणि सर्वजण त्यात अडकले असावेत, अशी थिअरी आहे. वेकनाची शक्ती इतकी प्रचंड आहे की त्याचा मृत्यू सहज वाटतो, म्हणून तो परत येईलच, असा विश्वास अनेकजण व्यक्त करत आहेत.

चाहत्यांनी सिरीजमधील इतर तपशीलांकडेही लक्ष वेधलं आहे. हॉकिन्स शहराचं रुप शेवटच्या एपिसोडमध्ये बदललेलं दिसतं, लोकांचे पेहराव आणि इतर गोष्टी वेगळ्या वाटतात, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, दिग्दर्शक डफर ब्रदर्सनी आणखी एका एपिसोडची शक्यता पूर्णपणे नाकारली आहे. येत्या १२ जानेवारीला ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या पडद्यामागील गोष्टींवर आधारित ‘वन लास्ट अॅडव्हेंचर’ नावाचा विशेष एपिसोड रिलीज होणार आहे, जो चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण ठरेल.

‘स्ट्रेंजर थिंग्स’मधील माईक, इलेव्हन, डस्टिन, विल, लुकास आणि मॅक्स या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. या सिरीजने चार सिझन गाजवून पाचव्या सिझनसह एक युग संपवलं, पण चाहत्यांच्या थिअरींमुळे चर्चा कायम राहणार आहे. नेटफ्लिक्सवर सध्या ही सिरीज ट्रेंड करत असून, चाहते शेवट स्वीकारण्यास तयार नाहीत.

Summary
  • ‘स्ट्रेंजर थिंग्स’ सिझन 5 च्या शेवटावर चाहत्यांची नाराजी

  • एपिसोड 9 किंवा सिक्रेट ट्विस्टची सोशल मीडियावर चर्चा

  • वेकना जिवंत असल्याची आणि फॉल्स रिअॅलिटीची थिअरी

  • डफर ब्रदर्सनी नवा एपिसोड नाकारला, विशेष BTS एपिसोड जाहीर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com