अंगावर शहारे आणणारा ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अंगावर शहारे आणणारा ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देण्याऱ्या मावळ्यांचे योगदान देखील खूप महत्त्वाचे आहे. अशाच एका शूरवीराची कथा लेखक - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नवीन चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे, तर मृणाल कुलकर्णी जिजाऊ साहेबांची भूमिका साकारणार आहे.

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकंतच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सुरुवात आऊसाहेब कोंढाणा किल्ल्याबद्दल बोलताना दिसत आहे. त्यावर पुढच्या एका महिन्यात कोंढाणा तुमच्या चरणाशी आणून नाही ठेवला, तर नाव शिवबा नाही सांगणार, असे बोलताना दिसत आहेत.

“म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्यात, पर त्या समद्यांसनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राजं हवं ना”, असा डोळ्यात अश्रू आणणारा एक डायलॉगही पाहायला मिळत आहे. येत्या १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ हा चित्रपटात संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com