Sukh Mhanje Nakki Kay Asta: प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं अधिराज्य! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ चार वर्षाच्या यशस्वी प्रवासानंतर घेणार निरोप
सध्या स्टार प्रवाहवर अनेक नव्या मालिका आलेल्या पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये काही मालिकांचा प्रोमो रिलीज झाला अन् आता त्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यात 'तु ही रे माझा मितवा', 'लग्नानंतर होईलच प्रेम' आणि 'आईबाबा रिटायर होत आहेत!' या तीन नव्या मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या पाहायला मिळत आहेत. या नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करायला सज्ज झाल्या आहेत.
यादरम्यान स्टार प्रवाहवरील काही जुन्या मालिका ज्यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. याआधी पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करुन आई कुठे काय करते ही मालिका संपली. अशीच एक मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चार वर्ष आपलं अधिराज्य केल आहे. तर आता ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शुटींग पूर्ण झाला ज्यात शालिनीचा अंत करत मालिकेचा देखील शेवट करण्यात आला आहे. शुटींगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक झालेले पाहायला मिळाले. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या शर्यतीत होती. सुरुवातीला ही मालिका टॉप 5 मध्ये होती, आताही या मालिकेचं टॉप 10 मधील स्थान कायम आहे. मालिकेसह यातील कलाकारांनाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आणि आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान स्टर प्रवाहने 'शिर्के-पाटील कुटुंबाच्या साथीने नित्या-अधिराज करणार शालिनीचा अंत... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' महाअंतिम भाग' ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.