IFFSA कॅनडा येथे सनी लिओनीच्या 'केनेडी'च होणार खास स्क्रिनिंग!

IFFSA कॅनडा येथे सनी लिओनीच्या 'केनेडी'च होणार खास स्क्रिनिंग!

अभिनेत्री सनी लिओनला IFFSA कॅनडा येथे तिच्या केनेडी चित्रपटासाठी सन्मानित केलं जाणार ! अभिनेत्री सनी लिओनी च्या केनेडी साठी अभिमानास्पद बाब IFFSA कॅनडा येथे होणार खास स्क्रिनिंग
Published by  :
Team Lokshahi

कान्स येथील मिडनाईट स्क्रिनिंगमध्ये प्रीमियर झाल्यापासून सनी लिओनीच्या केनेडी या चित्रपटाच जगभरातून कौतुक होत आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हल, दक्षिण कोरियाचा बुकियन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हल (BIFAN), आणि Neuchâtel इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म (NIFFF) या तीन यशस्वी स्क्रीनिंगनंतर आता केनेडी कॅनडामधल्या दक्षिण आशियाचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (IFFSA) मध्ये पोहचला आहे.

IFFSA घोषणेने सिनेप्रेमींना आता सनीच्या चित्रपटाची उत्सुकता असून या बहुप्रतिक्षित चित्रपटातील अभिनेत्रीची उल्लेखनीय कामगिरी बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तिच्या चाहत्यांना सनी लिओनीचे “चार्ली” हे अनोखं पात्र बघण्याची संधी मिळणार आहे.

या चित्रपट महोत्सवाची ही 12वी आवृत्ती असून 12 ते 22 ऑक्टोबर 2023 या कालावधीत हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. सनीचे चाहते केनेडी भारतात रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. सनी आता नवीन काय करणार हे बघण देखील तितकच उत्सुकतेच ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com