सूरज चव्हाणच्या 'राजा राणी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

सूरज चव्हाणच्या 'राजा राणी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

इन्स्टाग्रामवर कॉमेडी रिल्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनललेल्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनची ट्रॉफी जिंकली.
Published by :
shweta walge
Published on

इन्स्टाग्रामवर कॉमेडी रिल्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनललेल्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनची ट्रॉफी जिंकली. सूरजच्या साधेपणाने लाखो चाहत्यांची मनं जिंकली. 'बिग बॉस' 5 च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सूरज आता त्याच्या गावी मोढवे, तालुका बारामतीत परतला आहे. यातच सूरजने आता आगामी सिनेमाचा ट्रेलरही नुकताच लॉन्च केला आहे.

सूरज 'बिग बॉस'च्या ट्रॉफीसह त्याच्या मोढवे गावातील आई मरीमातेच्या चरणी नतमस्तक होत त्याने त्याच्या आगामी 'राजा राणी' चित्रपटाचा स्वतःच्या हस्ते ट्रेलर लॉन्च केला आहे. बारामतीत सूरजच्या हस्ते मोढवे गावात 'राजा राणी' चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण करण्यात आलं , यावेळी सुरजच्या 'राजाराणी' च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात बिग बॉस फेम वैभव चव्हाण ने सुद्धा उपस्थिती लावली होती.

या चित्रपटात सूरज चव्हाण महत्त्वाचा भूमिकेत दिसणार आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता सूरज येत्या 18 ऑक्टोबर पासून मोठा पडदा गाजवायलाही सज्ज होणार आहे. सत्य घटनेवर आधारित उलगडणार्‍या 'राजाराणी' या प्रेमकथेतून तो महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटात रोहन पाटील , सुरज चव्हाण , तानाजी गळगुंडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्येही नायक नायिकेच्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी सूरज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतोय. ट्रेलरमध्येही त्याचा गोलीगत पॅटर्न पाहणं रंजक ठरतंय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com