चौथ्या राज्यस्तरीय राजकुमार काळभोर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुर्यकांत नामगुडे यांची निवड
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ४ थे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलन मंगळवार दिनांक १९ ॲागस्ट २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे संपन्न होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सुर्यकांत नामुगुडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी दिली आहे,
श्री नामुगडे हे गेली ४० वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या विनोदी शैलीतील कविता व कथा प्रचंड लोकप्रिय आहेत, निर्मला (कथासंग्रह) मेघमल्हार काव्यसंग्रहासह एकूण ९ ग्रंथांचे विपुल लेखन त्यांनी केले आहे, महात्मा फुले फेलोशिप सह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत,
उद्घाटनसमारंभ,कविसंमेलन,कथाकथन,परिसंवाद,चर्चासत्र असे संमेलनाचे स्वरूप असून १९ ॲागस्ट ला सकाळी १० वाजता संमेलनाचा प्रारंभ होणारआहे,राज्यभरातून ३५० साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार आहेत,साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनासाठी नुकतीच एक बैठक पुणे येथे संपन्न झाली त्यावेळी सदर निवड सर्वानूमते करण्यात आली यावेळी सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक किशोर टिळेकर,साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर,
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोंगळे,हनुमंत चिकणे, महाराष्ट्र सरचिटणीस सुनील लोणकर, प्रदेश संघटक सचिव अमोल कुंभार, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विक्रम शिंदे,पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिभा मगर, युवा प्रदेशाध्यक्ष ॲड.सुमेद्य गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सुवर्णा वाघमारे,पुणे विभागीय सरचिटणीस जयश्री नांदे.पुणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर,पुणे पूर्व जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर, पुणे दक्षिण चे जिल्हाध्यक्ष
रमेश रेडेकर, खेड तालुकाध्यक्ष मधुकर गिलबिले, मावळ तालुकाध्यक्ष विठ्ठल दळवी,पुणे शहर उपाध्यक्ष सिंधु साळेकर, पुणे शहर सरचिटणीस बाळकृष्ण अमृतकर, पुणे शहर महिला अध्यक्ष प्राजक्ता मुरमट्टी, पुणे जिल्हा पूर्व च्या महिला जिल्हाध्यक्ष प्रा.वंदना ढोले आदीजण उपस्थित होते.