स्वरा भास्कर आणि फहाद अहमद झाले आई-बाबा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद झाले आई-बाबा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म

स्वरानं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया असं ठेवले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) आणि फहाद अहमद (Fahad Ahmad) आई-बाबा झाले आहेत. स्वरानं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया असं ठेवले आहे. स्वरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.

स्वरानं सोशल मीडियावर फहाद अहमद आणि तिच्या लेकीसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. स्वरानं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये फहाद हा बाळाला घेऊन बसलेली दिसत आहे. टिस्का चोप्रा,नीना गुप्ता, मोहम्मद झीशान अय्युब या सेलिब्रिटींनी स्वरानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन स्वरा आणि फहाद अहमद यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी स्वराची बेबी शॉवर पार्टी देखील झाली होती. स्वरानं तिच्या बेबी शॉवर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

स्वरानं काही महिन्यांपूर्वी फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली. स्वरानं तिच्या आणि फहादच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. तिनं पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे आणि ते प्रेमाला संधी देते.' स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले. स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या रिसेप्शन, संगीत आणि मेहंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com