Guarav More: गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' चित्रपटाचा टीझर रिलीज

Guarav More: गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' चित्रपटाचा टीझर रिलीज

प्रीतम एस. के. पाटील दिग्दर्शित 'अल्याड पल्याड' हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती सातत्याने होताना दिसते आहे. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस. के. पाटील दिग्दर्शित 'अल्याड पल्याड' हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता गौरव मोरे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

एस. एम.पी प्रोडक्शन अंतर्गत ‘अल्याड पल्याड' चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली आहे. ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात गौरव मोरेसह सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर हे कलाकार झळकणार आहेत. ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. चित्रपटाची कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत.

आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित ‘अल्याड पल्याड’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरने आणि उत्कंठावर्धक टिझरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पोस्टर मध्ये घाबरलेल्या अंदाजात गौरव पाहायला मिळतोय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com