Tejashri Pradhan Exit From Premachi Goshta: तेजश्री प्रधानचा 'मुक्ता' पात्राला राम राम! "ही" अभिनेत्री करणार प्रेमाची गोष्टमध्ये एन्ट्री
स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला युवकांपासून ते वयस्करांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा चाहतावर्ग मिळाला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रासह ही मालिका प्रत्येकाच्या आवडीची ठरली आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान, शुभांगी गोखले, राज हंचनाळे तसेच अपूर्वा नेमळेकर आणि संजीवनी जाधव यांसारखे रुजलेले कलाकार पाहायला मिळत आहेत. या कलाकारांच्या जबरदस्त पात्रासह त्यांचा तगडा अभिनय या मालिकेला उत्कृष्ट बनवत आहे. मालिकेत येणारे वेगवेगळे ट्विस्ट या मालिकेची लोकप्रियता वाढवतात त्यामुळे या मालिकेचा चाहतावर्ग ही मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे.
तेजश्री प्रधानची मालिकेतून एक्सिट
या मालिकेतून सर्वात आधी मिहीका हे पात्र साकारणारी मृणाली शिर्के हीने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून निरोप घेतला आणि तिच्या जागेवर अमृता बने ही मिहीका हे पात्र साकारताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर तिचा हळूहळू प्रेक्षकांनी स्विकार केला आणि मालिकेचा टीआरपी पुन्हा एकदा वर आला आणि टीआरपीमध्येही या मालिकेचे स्थान टॉप 5 मध्ये राहिले आहे. सगळं काही सुरळीत चालत असताना या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे. या मालिकेत 'मुक्ता' हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधानने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले.
तेजश्रीच्या जागी कोण साकारणार "मुक्ता" पात्र
सुरुवातीपासून तेजश्रीच्या कमबॅकमुळे ही मालिका चर्चेत आली होती. मात्र, आता तिच ही मालिका सोडत असल्यामुळे मालिकेचा टीआरपी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण, मुक्ता हे पात्र तेजश्री प्रधानने प्रेक्षकांच्या मनात चांगलचं रोवल होत. मात्र आता तिच्या जागेवर 'स्वरदा ठिगळे' ही मुक्ता हे पात्र साकारणार आहे, दरम्यान तिला देखील प्रेक्षक मुक्ताच्या पात्रात स्विकारणार का? असा महत्त्वाचा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
तेजश्रीची सोशल मीडिया पोस्ट
तेजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे शिवाय तिने स्टोरी देखील ठेवली आहे ज्यात तिने लिहलं आहे की, 'आज घेतलेला योग्य निर्णय तुमच्या भविष्याला आकार देतो, तसेच पोस्टमध्ये तेजश्रीने लिहलं आहे की, "चिअर्स !! कधीकधी तुम्हाला बाहेर पडावे लागते, तुमची लायकी जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण तुमच्यासाठी असे कोणीही करणार नाही".