...आता महाराष्ट्रावर ‘राज’ करावं; राजकीय परिस्थितीवर तेजस्विनी पंडितचं ट्वीट व्हायरल

...आता महाराष्ट्रावर ‘राज’ करावं; राजकीय परिस्थितीवर तेजस्विनी पंडितचं ट्वीट व्हायरल

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

tejaswini pandit : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यातच मनोरंजन क्षेत्रातून देखिल प्रतिक्रिया उमटत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने प्रतिक्रिया दिली आहे. तीनं ट्विट केलं आहे. जे चांगलेच व्हायरल होत आहे. तेजस्विनी पंडित ट्विट करत म्हणाली की, “तत्वनिष्ठ, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अशाच माणसाने आता महाराष्ट्रावर ‘राज’ करावं. – महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक,” ‘महाराष्ट्र आता तरी जागा हो’ असं तेजस्विनीने ट्वीटमध्ये म्हटलंय.

तेजस्विनीने तिच्या ट्वीटमध्ये राज शब्द वापरला आहे. त्यावरुन आता तिच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनीही राज ठाकरेंचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com