Maithili
MaithiliTeam Lokshahi

Maithili : टीव्ही अभिनेत्री मैथिलीचा आत्महत्येचा प्रयत्न

पतीविरोधात केली होती पोलिसांत तक्रार
Published by :
Team Lokshahi

तेलगू टीव्ही अभिनेत्री मैथिलीने (Telugu television actor Maithili )आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या (suicide)करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिला वाचवले आहे.

Maithili
गजानन काळेंचे टि्वट अन् मुख्यमंत्री बदलाची चर्चा

मैथिलीने 6 महिन्यांपूर्वी तिच्या पतीविरोधात छळाचा गुन्हा दाखल केला होता. मैथिलीने तिचा पती श्रीधर रेड्डीसह इतर 4 जणांवर तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण कायदेशीर कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे.

मंगळवारी मैथिलीने झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलिस तिच्या फोनचे सिग्नल ट्रॅक करत योग्य वेळी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले. ती तिच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळली. पोलिसांनी तिला उपचारासाठी निम्स रुग्णालयात दाखल केले. जिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Maithili
'मन उडू उडू झालं' फेम ह्रता दुर्गुळे अडकली लग्नबंधनात...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com