'सलमान सोसायटी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही केल कौतुक

'सलमान सोसायटी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही केल कौतुक

सध्या सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर सलमान सोसाइटी चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटिला आली होती आणि ती लोकांच्या पसंतीत ही उतरलेली.
Published by  :
shweta walge

सध्या सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर सलमान सोसाइटी चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटिला आली होती आणि ती लोकांच्या पसंतीत ही उतरलेली.

चित्रपटाचा विषय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना खुप आवडला असून चित्रपटा ला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आठवले यांनी शिक्षणाचा विषय यावरती चित्रपट आहे म्हणून याचं भरभरून कौतुक केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसा अभ्यास केला आणि आपल्या चित्रपटांमधून मुलं कशी शिक्षण घेतात यावरती भाष्य केलं.

प्रेक्षकांनी चित्रपट डोक्यावर घेतला असुन जबरदस्त असा प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक आपल्या संपूर्ण कुटुंबा सोबत सिनेमाग्रहात येत असुन हया मध्ये लहान मोठ्यांचा समावेश आहे. सर्वाना चित्रपटातील संगीत आणि सर्वच कलाकारांचा अभिनय आवडत असुन दिग्दर्शना चे आणि पटकथेचे कौतुक केले आहे.

तसेच मराठी चित्रपटसृष्ठितील नामवंत आणि दिग्गज कलाकांरा दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता उपेंद्र लिमये अंशुमन विचारे , विजय पाटकर , पुष्कर जोग, अभिजीत श्वेतचंद्र,शिल्पा तुलस्कर, कमलेश सावंत यांनी ही शुभेच्छा देत हा चित्रपट सर्वानी बघावा ही विनंती केली आहे.

सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केली आहे . 'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. चित्रपटा ला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यानि दिले असुन डीओपी फारूक खान आहेत . या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत आहेत

चित्रपटा मध्ये उपेंद्र लिमये पहुण्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटा मध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.

प्रजक्ता एंटरप्राइजेस निर्मित विडियो पॅलेस प्रस्तुत सलमान सोसाइटी १७ नोव्हेंबर २०२३ ला सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित झाला असुन म्यूजिक वीडियो पॅलेस वर उपलब्ध आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com