‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या स्पर्धकाला मिळाली रोहित शेट्टींच्या चित्रपटामध्ये संगीत देण्याची संधी

‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या स्पर्धकाला मिळाली रोहित शेट्टींच्या चित्रपटामध्ये संगीत देण्याची संधी

Published on

सोनी टीव्हीवरील (Sony TV) 'इंडियाज गॉट टॅलेंट' सीझन 9'हा ('India's Got Talent' Season 9) शो सुरु आहे. या शोच्या आगामी भागामध्ये चित्रपट निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) पाहुणा परीक्षक म्हणून आला आहे. अनेक वेळा शोमधील स्पर्धकांना बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या संध्या मिळत असतात. तसेच या शोच्या माध्यमातून 'इंडियाज गॉट टॅलेंट' सीझन 9' मधील एका स्पर्धक जोडीला रोहितने त्याच्या आगामी चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली आहे.


रोहित शेट्टीने त्याचे कौतुक केले आणि असं गाणं आजपर्यंत ऐकल नाही असेही म्हणाला. निर्माता रोहित शेट्टी यांनी स्पर्धक दिव्यांश (Divyansh) आणि मनुराज (Manuraj) यांना त्याच्या अगामी 'सर्कस' (Circus) चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली. हा व्हिडिओ सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com