‘बिग बॉस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार

‘बिग बॉस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार

Published by :

नेहमीच चर्चेत असलेला टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे 'बिग बॉस'. यावर्षी बिग बॉस 15 हा कार्यक्रम तीन महिन्यांऐवजी सहा महिने चालणार आहे. तसेच हा कार्यक्रम सहा आठवडे ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केला जाणार आहे. चाहते नव्या सीझनसाठी भरपूर उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतच आता बिग बॉस 15 च्या पहिल्या स्पर्धकाची झलक समोर आली आहे.

दिवसेंदिवस नव्या पर्वाबद्दल काही ना काही नवीन गोष्टी समोर येत असतात. आत्ता चाहत्यांची उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण नुकताच 'बिग बॉस 15'च्या पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. बिग बॉस 15 ची पहिली स्पर्धक प्रसिद्ध गायिका नेहा भसीन असणार आहे.

बिग बॉस 15 चा पहिला स्पर्धक म्हणून प्रसिद्ध गायिका नेहा भसीनचं नाव जाहीर करण्यात आलंय. वूट सिलेक्टवर नेहाचा परिचय देणारा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com