अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित ‘ऊंचाई’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर

अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित ‘ऊंचाई’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. सध्या ते सोनी टिव्हीवरच्या कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. सध्या ते सोनी टिव्हीवरच्या कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असतात. नेहमी ते फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी आगामी चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘ऊंचाई’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता आणि परिणीती चोप्रा दिसणार आहेत. हे पोस्टर शेअर करत अमिताभ बच्चन म्हणाले की, “यंदाचा फ्रेंडशिप डे आगामी राजश्री प्रॉडक्शनचा ‘ऊंचाई’ या चित्रपटाची पहिली झलक पाहून साजरा करा. यात माझ्यासोबत अनुपम खेर आणि बोमन इराणी हे या प्रवासात सहभागी झालेत.” सूरज बडजात्या दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित ‘ऊंचाई’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर
Saif Ali Khan : सेटवर झालं भांडण ; सैफने मागितली माफी...
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com