Jailer: रजनीकांत यांचा अनोखा अंदाज; बहुचर्चित ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित

Jailer: रजनीकांत यांचा अनोखा अंदाज; बहुचर्चित ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित

‘जेलर’ मध्ये रजनीकांत या नावाची जादू आणि एकूणच त्यांचा दमदार अंदाज त्यांच्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.
Published by  :
Team Lokshahi

रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपट स्क्रीनवर येताच बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. साऊथचा सुपरस्टार रजनीकांत 'जेलर' सोबत दोन वर्षांनंतर पडद्यावर कमबॅक करत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘जेलर’ चित्रपटाच्या प्रेक्षक प्रतीक्षेत होते. त्यामुळेच या चित्रपटाच्या एडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. तामिळनाडूतील तब्बल ९०० चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘जेलर’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच एडव्हान्स बुकिंगमधून देशात १४.१८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनची ५ लाख ९१ हजार २२१ तिकीटे तर तेलुगु व्हर्जनच्या ७७ हजारांहून अधिक तिकिटांची प्रदर्शनाआधीच विक्री झाली.

‘जेलर’ चित्रपट हा तमिळ, हिंदी आणि अन्य भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत आणि तमन्नासह जॅकी श्रॉफ, मोहनलाल, योगी बाबू, राम्या कृष्णन या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

साऊथ सुपरस्टारचा 'जेलर' हा चित्रपट 10 ऑगस्टला रिलीज झाला आहे, तर 'गदर 2' आणि 'OMG 2' 11 ऑगस्टला मोठ्या पडद्यावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. दुसरीकडे, दक्षिणेकडील राज्यांमध्ये 'जेलर' चा हँगओव्हर वाढत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com