झी मराठीवरील ‘या’ लोकप्रिय मालिकेचा आता हिंदीमध्ये होणार रिमेक

झी मराठीवरील ‘या’ लोकप्रिय मालिकेचा आता हिंदीमध्ये होणार रिमेक

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील नेत्रा-अद्वेतच्या जोडीचीही चाहत्यांना भुरळ पडली आहे. या मालिकेतील कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षा तावडे प्रमुख भूमिकेत आहे. तर ऐश्वर्या नारकर खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका या मालिकेत आहेत.

12 सप्टेंबर 2022 पासून सुरू झालेल्या या मालिकेला लवकरच दोन वर्षे पूर्ण होतील. आता मराठी प्रेक्षकांसह इतर भाषेतील प्रेक्षकही ही मालिका पाहू शकणार आहेत. कारण या मालिकेचं आता हिंदीमध्ये डबिंग होणार आहे. ‘अ‍ॅंड टिव्ही’ या वाहिनीवर ही मालिका ‘सातवें लडकी की सातवी बेटी’ या नावाने प्रसारित होणार आहे. आजपासून (27मे) ही मालिका सगळ्यांना पाहता येणार आहे. दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता या मालिकेचं प्रसारण ‘अ‍ॅंड टिव्ही’ या वाहिनीवर होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com