Lokshahi Marathi Sanwad 2025 | Tejaswini Pandit : "थिएटरची अवस्था दयनीय" अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सांगितली व्यथा
लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज 11 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद पार पडत आहे. या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन द ऑर्किड हॉटेल पुणे येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरवात झाली असून या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर तेजस्विनी पंडित यांच्या आई स्वर्गीय ज्योती चांदेकर यांचा लोकशाही मराठीच्या "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमात पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी येथे त्यांनी मुलगी तेजस्विनी पंडित उपस्थित होत्या.
दरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांना मनोरंजन क्षेत्रासाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं व्हिजन काय? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, "सध्या राज्यात "थिएटरची अवस्था दयनीय झाली आहे . त्यावर सरकारने काही तरी काम केलं पाहिजे कारण कला क्षेत्र हे अधिक कर भरणार क्षेत्र आहे. सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी प्रत्येक मराठी कलाकाराने उभे राहिले पाहिजे. त्याबरोबर कोकणात देखील चित्रपटगृह उभारले गेले पाहिजे कारण कोकणातील लोकांची अनेकदा तक्रार असते की कोकणात चित्रपट चित्रित केले जातात परंतु इथे चित्रपटगृह नाही. त्यावर मी नक्कीच अभ्यास करून काम करेन... "