पुन्हा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाची टीम राज्यभर दौऱ्यावर

पुन्हा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाची टीम राज्यभर दौऱ्यावर

मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर| मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. अशातच मनोज जरांगे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन काही कारणास्तव पुढे ढकलले होते, मात्र आता हा चित्रपट 21 जून 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे रायगड किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचे प्रोमोशन चालू केलेआहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाचे ज्या ज्या ठिकाणी प्रमोशन आहे त्या ठिकाणी चित्रपटाचे मुख्य कलाकार रोहन पाटील हे मनोज जरांगे यांच्याच वेशभूषेत फिरत आहेत. निर्माते गोवर्धन दोलताडे तर दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांची ही संपूर्ण टीम राज्यातील विविध कानाकोपऱ्यामध्ये जाऊन चित्रपटाविषयी माहिती देण्याचे काम करत आहेत. राज्यातील मुख्य ठिकाणी ही टीम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com