मनोरंजन
विद्यापीठात पुन्हा वाजणार नाटकाची तिसरी घंटा
तुषार झरेकर | पुणे : जवळपास गेली दीड वर्षे बंद असणारी नाटकाची घंटा आता वाजणार आहे. यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने 'वाघाची गोष्ट' हे नाटक सादर करण्यात येणार आहे.
मार्च २०२० पासून टाळेबंदी आणि इतर अनेक निर्बंधामुळे महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांचे प्रयोग जवळजवळ ठप्प झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही एकत्र येवून आपली कला सादर करता येत नव्हती. मात्र आता हे निर्बंध शिथिल केल्याने २२ आक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता, सावित्रीबाई फुले पुण विद्यापीठ मधील नामदेव सभागृह येथे ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रमांतर्गत 'वाघाची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे.