'मोनिका ओ माय डार्लिंग'चा ट्रेलर आला समोर, जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार

'मोनिका ओ माय डार्लिंग'चा ट्रेलर आला समोर, जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार

राजकुमार राव, हुमा कुरेशी आणि राधिका आपटे यांच्या आगामी 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राजकुमार राव, हुमा कुरेशी आणि राधिका आपटे यांच्या आगामी 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून चित्रपट सस्पेन्सने भरलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा चित्रपट एक क्राईम थ्रिलर आहे, ज्यामध्ये जबरदस्त कॉमेडी आणि ड्रामाही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात लाल रंगाचा लाँग गाऊन परिधान केलेली हुमा ग्लॅमरस दिसत आहे आणि पार्श्वभूमीत 'पिया तू अब तो आजा' हे गाणे वाजत आहे. यानंतर, रक्ताचे तुकडे दर्शविले जातात. त्यानंतर राजकुमार राव हाताने काच साफ करताना दाखवले आहेत.

चित्रपटात राधिका आपटे एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे, जी एका सस्पेन्सफुल केसची उकल करत आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर देखील आहे, त्याचे पात्रही गंभीर दाखवण्यात आले आहे.

हा चित्रपट एक डार्क कॉमेडी आहे, ज्यामध्ये गुन्हेगारी आणि सस्पेन्सची छटा असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'अंधाधुन' आणि 'मर्द को दर्द नहीं होता'चे दिग्दर्शक वासन बाला यांनी केले असून योगेश चांदेकर यांनी लिहिले आहे. या चित्रपटाची निर्मिती मॅच शॉट्सने केली आहे. या चित्रपटात मुख्य कलाकारांशिवाय भगवती पेरुमल, आकांक्षा रंजन कपूर, सुकांता गोयल आणि जैन मेरी खान हे कलाकारही दिसणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com