मनोरंजन
Bhul Bhulaiyya 3: 'भुल भुलैया ३' मध्ये कार्तिक आर्यनसह दिसणार 'ही' अभिनेत्री
भूल भुलैया ३ मध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकत्र दिसणार आहेत. २०२० च्या लव्ह आज कल २ चित्रपटानंतर हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान, भूल भुलैया ३ साठी पुन्हा एकत्र येणार आहेत. २०२० मध्ये प्रदर्शित लव्ह आज कल चित्रपटानंतर हा त्यांचा दुसरा एकत्र चित्रपट आहे. अहवालानुसार, हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटाचे शुटिंग फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होणार आहे.
भूल भुलैया २ च्या यशानंतर कार्तिक आर्यन, अनीस बज्मी आणि भूषण कुमार भुल भुलैया ३ फ्रँचायझी पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. त्यांना या चित्रपटाचे आणखी भाग बनवायचे आहे. आता हे सर्वजण फेब्रुवारी २०२४ पासून या चित्रपटावर काम करण्यास उत्सुक आहेत.
google
कार्तिक आणि सारा पुन्हा एकत्र येण्यासाठी उत्सुक
भूल भुलैया ३ चित्रपटाचे शुटिंग फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होणार आहे. सूत्रांनुसार कार्तिक आर्यन आणि सारा अली खान दोघेही पुढच्या वर्षी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्याबद्दल उत्साही आहेत.