नावेदनंतर आता हा प्रसिद्ध अभिनेता होणार ‘बिग बॉस 17’ मधून आऊट? चाहते हैराण

नावेदनंतर आता हा प्रसिद्ध अभिनेता होणार ‘बिग बॉस 17’ मधून आऊट? चाहते हैराण

प्रसिध्द टीव्ही शो बिग बॉस 17 मध्ये सध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरामधून नावेद बाहेर पडलाय.
Published by :
shweta walge
Published on

प्रसिध्द टीव्ही शो बिग बॉस 17 मध्ये सध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरामधून नावेद बाहेर पडलाय. यानंतर आता बिग बॉस पाहणाऱ्यांना मोठा झटका लागणार आहे. कारण अजून एक स्पर्धक घराबाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्टनुसार बिग बॉस 17 मधून चक्क नील भट्ट हा बाहेर पडणार असल्याचे सांगितले जातं आहे. हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. बिग बॉस 17 मध्ये नील भट्ट हा पत्नी ऐश्वर्या शर्मा हिच्यासोबत सहभागी झाला. मात्र, नील भट्ट हा घरात धमाकेदार गेम खेळताना दिसला नसल्यामुळे त्याला बेघर होणार आहे. हेल कळताच कळताच ऐश्वर्या शर्मा ही ढसाढसा रडताना दिसली. मात्र, यामुळे घरातील सदस्यांसोबतच चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत तर ऐश्वर्या शर्मा ही पती नील भट्ट याच्यासोबत दाखल झालीये. मात्र, आता नील हा बिग बॉस 17 मधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा प्रोमो शोच्या आगामी भागाचा असून या व्हिडीओमध्ये बिग बॉस 17 च्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांसाठी खास टास्क दिसल्याचे दिसत आहे. मात्र, मनारा चोप्रा हिच्यामुळे टास्कमध्ये मोठा हंगामा होताना दिसतोय. पुढील काही दिवसांमध्ये बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे होऊ शकतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com