‘हे’ आहे सैफ अली खान आणि करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव

‘हे’ आहे सैफ अली खान आणि करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव

Published by :
Published on

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी २१ फेब्रुवारीला छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिल्या पासूनच अनेक चाहते सैफिनाच्या दुसऱ्या मुलाची झलक पाहणयासाठी उत्सुक आहेत. सैफ-करीनाचा पहिला मुलगा तैमूरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सैफिनाने दुसऱ्या मुलाला मीडियापासून दूरच ठेवण्याचा विचार केलाय. आता तैमूरच्या छोट्या भावाचं नाव समोर आलंय.

एका वृत्तानुसार सैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवायचं यावर विचार करत आहेत. मात्र सध्या सैफ त्याला लाडाने 'जेह' (Jeh) म्हणतो. सैफिनाच्या दुसऱ्या मुलाचं हे नीकनेम म्हणजेच टोपणनाव आहे असं म्हंटलं जातंय. असं असलं तरी सैफ आणि करीनाने अद्याप त्यांच्या मुलाचं नामकरण केलेलं नाही.तर रिपोर्ट्सनुसार सैफ अली खानला त्याच्या दुसऱ्या मुलाला आपल्या वडिलांचं म्हणजे मंसूर हे नाव द्यायचं आहे. सैफचे वडील मंसूर अली खान पटौदी हे पटौदीने नवाब तसचं प्रसिद्ध क्रिकेटर होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com