Shahrukh Khan: किंग खानचा दुबईत जलवा! बुर्ज खलिफावर झळकला 'जवान'चा ट्रेलर

Shahrukh Khan: किंग खानचा दुबईत जलवा! बुर्ज खलिफावर झळकला 'जवान'चा ट्रेलर

'जवान'चा ट्रेलर दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर दाखविण्यात आला आहे.
Published by  :
Team Lokshahi

सध्या शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपट जावनमुळे चर्चेत आहे. जवानचा ट्रेलर रिलिज करण्यात आला ज्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. केवळ एका तासातच ट्रेलरला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले होते.

भारतात जलवा दाखवल्यानंतर शाहरुख खानच्या जवानचा दमदार ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफा येथे लॉन्च करण्यात आला आहे. बुर्ज खलिफावर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करून टिमने मोठी घोषणा केली.

शाहरुखची संपूर्ण टीम यावेळी दुबईला उपस्थित होती. या वेळी शाहरुखने चित्रपटातील जिंदा बंदा गाण्यावर जोरदार नृत्य केले. याशिवाय चित्रपटातील 'चलेया' या गाण्याचे अरेबिक व्हर्जनही लाँच करण्यात आले. यावेळी शाहरुखच्या 20000 हून अधिक चाहत्यांच्या उपस्थितीत बुर्ज खलिफा येथे जवानचा ट्रेलर लॉन्च केला. बुर्ज खलिफावरील जवानाचा ट्रेलर पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ट्रेलर बुर्ज खलिफा येथे सकाळी 10:30 आणि रात्री 9:00 वाजता जीएसटीवर जवानाचा हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com