India Lockdown
India LockdownTeam Lokshahi

'इंडिया लॉकडाऊन' चा ट्रेलर रिलीज

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने तिच्या अभिनयाच्या शैलीने मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमधून प्रक्षेकांची मने जिंकून घेतली आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने तिच्या अभिनयाच्या शैलीने मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमधून प्रक्षेकांची मने जिंकून घेतली आहेत. सईने चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे. तसेच सई सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता.

या वर्षातील मधुर भांडारकर यांचा ओटीटीवर रिलीज होणारा हा दुसरा चित्रपट असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. पण नंतर हा लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आला

'इंडिया लॉकडाउन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती, यासंदर्भातील वास्तव हे 'इंडिया लॉकडाउन' या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 'इंडिया लॉकडाउन' हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी सई ताम्हणकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com