'तू तेंव्हा तशी' मालिकेतील 'या' अभिनेत्रीबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?
सध्या झी मराठीवर तेव्हा तशी तू ही नवीन मालिका सुरू झाली आहे. या मालिकेमध्ये स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर हे दिसले आहेत. शिल्पा तुळसकर ही गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. शिल्पा तुळसकर हिने अनेक मालिका चित्रपटातही काम केले आहे. शिल्पा तुळसकर हिने सगळ्यात आधी बोमकेश बक्षी 1993 मध्ये आलेल्या या मालिकेत काम केले होते.
यामुळे तिने तुलसी नावाचे पात्र साकारले होते. त्यानंतर तिने दूरदर्शनवर शांती या मालिकेत रांजनाची भूमिका केली. ती 1994 मध्ये आली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्याचबरोबर तिने देवकी या 2001 मध्ये आलेल्या चित्रपटात काम केले होते. 2005 मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या चित्रपटातील तिची भूमिका देखील लोकप्रिय झाली होती.
तिचा जन्म 1977 मधला आहे. तिच्या पतीचे नाव विशाल शेट्टी आहे, तर तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिची एकूण संपत्ती अडीच कोटी रुपयांची आहे. प्रत्येक भागासाठी ती 50 हजार रुपये मानधन घेत असल्याचे सांगण्यात येते.