‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वाहिनीसाहेबां’चे छोट्या पडद्यावर पुनरागमन

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वाहिनीसाहेबां’चे छोट्या पडद्यावर पुनरागमन

Published by :
Published on

तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोलेली अभिनेत्री धनश्री काडगांवकर आता पुन्हा छोट्या पडद्यावर आगमन करत आहे. धनश्रीने या आधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिची वहिनीसाहेब ही भूमिका विशेष गाजली होती. पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोलेली अभिनेत्री धनश्री दिसणार आहे.

या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. घेतला वसा टाकू नको असं मी माझ्या मनाशी पक्क करून हि भूमिका स्वीकारली अशी प्रतिक्रिया तिने यावेळी दिली आहे. धनश्री मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची तितकीच उत्सुकता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com