Upcoming Web Series & Films; दिवाळीला ओटीटीवर धमाकेदार सीरिज व सिनेमांची मेजवानी

Upcoming Web Series & Films; दिवाळीला ओटीटीवर धमाकेदार सीरिज व सिनेमांची मेजवानी

Published by :
Published on

३ नोव्हेंबरला प्राईमवर 'अक्कड बक्कड रफू चक्कर' ही सीरिजही तुमच्या भेटीस येतोय. दिवंगत दिग्दर्शक व निर्माता राज कौशल यांची ही अखेरची सीरिज आहे. नेटफ्लिक्सवर येत्या ५ नोव्हेंबरला 'मीनाक्षी सुंदरेश्वर' हा चित्रपट येतोय. सान्या मल्होत्रा व अभिमन्यू दासानी यात मुख्य भूमिकेत आहेत.

५ नोव्हेंबरलाच सोनी लिव्हवर 'ट्रिस्ट विद डेस्टिनी' हा सिनेमा रिलीज होतोय. यात आशीष विद्यार्थी, जयदीप अहलावत, विनीत कुमार, अमित सियाल मुख्य भूमिकेत आहेत.१२ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर 'रेड नोटिस' हा अमेरिकन अ‍ॅक्शन कॉमेडी सिनेमा प्रदर्शित होतोय. ड्वेन जॉनसन, रायन रेनोल्ड्स, गैल गैइड यात मुख्य भूमिकेत आहेत.

१२ नोव्हेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर ' स्पेशल ऑप्स १.५' ही केके मेननची वेबसीरिजही रिलीज होतोय. १८ नोव्हेंबरला एमएक्स प्लेअरवर 'मस्त्यकांड' ही सीरिज तुम्ही पाहू शकाल. यात रवी दुबे, रवी किशन, पीयूष मिश्रा, जोया अफरोज महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत १९ नोव्हेंबरला 'द व्हील ऑफ टाइम' ही सीरिज प्राईमवर रिलीज होतेय. १९ नोव्हेंबरलाच नेटफ्लिक्सवर कार्तिक आर्यनचा 'धमाका' हा सिनेमा रिलीज होतोय. २४ नोव्हेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर मार्वल स्टुडिओची 'हॉक आई' सीरिज तुम्ही बघू शकाल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com