अभिनेता वरुण धवन – नताशा अखेर विवाहबंधनात

अभिनेता वरुण धवन – नताशा अखेर विवाहबंधनात

Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन अखेर गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाहबंधनात अडकला आहे. अलिबागमध्ये त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला.22 जानेवारीपासून यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली होती आणि आज अखेर या दोघांनी साताजन्माची गाठ बांधली आहे.

सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील काही फोटो व्हायरल होत आहेत.अलिबाग येथील द मेन्शन हाऊस येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती हा लग्नसोहळा पार पडला.

काही वेळापूर्वीच वरुण-नताशाच्या संगीत सोहळ्याचे फोटो समोर आले होते. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.अगदी मोजक्या पाहुण्यांनाच या सोहळ्याचे आमंत्रण दिले होते. या लग्नसोहळ्यात फक्त 50 जणांनाच आमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे.सुरक्षेची अत्यंत कडेकोट व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मोबाईल वापरण्यास मनाई केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com