Boman Irani: राम चरणच्या ‘पेड्डी’च्या शूटिंगमध्ये दिग्गज अभिनेता बोमन इराणी झाले सहभागी, BTS फोटो आला समोर
राम चरणच्या बहुचर्चित ‘पेड्डी’ या चित्रपटाचा अनाउन्समेंट व्हिडिओ, फर्स्ट-लुक पोस्टर्स आणि टीझर — प्रत्येक गोष्टीने सोशल मीडियावर अफाट चर्चा, ट्रेंड्स आणि प्रचंड उत्सुकता निर्माण केली. त्याचप्रमाणे चित्रपटातील पहिलं गाणं ‘चिकिरी चिकिरी’ रिलीज होताच धुमाकूळ घालत फक्त 24 तासांत 46 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत वर्षातील सर्वाधिक पाहिलेल्या आणि आवडलेल्या गाण्यांपैकी एक बनलं.
या वाढत्या क्रेझच्या दरम्यान आता चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठं अपडेट समोर आलं आहे. ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते बोमन इराणी शूटिंगचा भाग बनले आहेत. सोशल मीडियावर मेकर्सनी बोमन इराणी यांच्या ‘पेड्डी’मधील एंट्रीची घोषणा एका BTS फोटोसह केली आहे. या फोटोत बोमन इराणी दिग्दर्शक बुची बाबू सना आणि सिनेमॅटोग्राफर आर. रत्नावेलू यांच्यासोबत दिसत आहेत.
बोमन इराणी हे एक बहुआयामी आणि अप्रतिम अभिनेते असून मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई, डॉन: द चेस बिगिन्स अगेन, 3 इडियट्स, जॉली एलएलबी यांसारख्या अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांत त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. आता ते ‘पेड्डी’चा भाग बनत असल्याने, प्रेक्षकांना त्यांना या चित्रपटात पाहणं खरोखरच रोमांचक ठरणार आहे.
राम चरण, जान्हवी कपूर, जगपती बाबू, शिवा राजकुमार आणि दिव्येंदु शर्मा अशा दमदार कलाकारांनी सजलेला ‘पेड्डी’ चित्रपट बुची बाबू सना दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट मायथ्री मूव्ही मेकर्स आणि सुकुमार राइटिंग्स प्रस्तुत करत असून तो वृद्धी सिनेमाजच्या बॅनरखाली निर्मित होत आहे. ‘पेड्डी’ 27 मार्च 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
