Chhaava Movie : 'छावा' चित्रपटाच्या यशामुळे निर्मात्यांना किती फायदा? काय आहे आकडेवारी?
या वर्षाची सुरुवात मनोरंजन क्षेत्रासाठी खूपच चांगली ठरली. अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला आहे. हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 11 दिवस झाले आहेत. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. या चित्रपटाने आजवर किती कमाई केली आहे? याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 11 दिवसांमध्येच 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेल्या कलेक्शनबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. काही तज्ञांच्या मते लवकरच हा चित्रपट 400 कोटी रुपयांचा टप्पा पार करु शकतो.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट 130 कोटी रुपयांमध्ये तयार झालं. मात्र या चित्रपटाने बजेटपेक्षा अडीचपट अधिक कमाई केली आहे. यामुळे आता चित्रपट निर्मात्यांना चांगलाच फायदा झाला आहे. आकडेवारीनुसार, चित्रपटाची कमाई 270 % पेक्षा अधिक झाली आहे. ही आकडेवारी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटापेक्षाही अधिक आहे.
पुष्पा 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन १२३४.१ कोटी रुपये झाले होते. तसेच चित्रपटाचे बजेट हे ५०० कोटी रुपये होते. त्यानुसार पुष्पा सिनेमाने बजेटच्या केवळ २४६ टक्के जास्त कमाई केली होती. तर छावाने अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला मागे टाकत केवळ ११ दिवसांत २७० टक्के अधिक कमाई केली आहे.