विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केली घोषणा

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केली घोषणा

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा लवकरच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
Published by  :
Team Lokshahi

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा लवकरच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. शिवाजी पार्क मैदानात मनसेचा दीपोत्सव सुरु आहे. या दीपोत्सवाचं हे यंदाचं ११ वं वर्ष आहे. याच कार्यक्रमात राज ठाकरेंनी विकीच्या भूमिकेबाबत पहिल्यांदाच माहिती उघड केली.

मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरेंनी विकी कौशलचं कौतुक केलं आहे. त्यावेळी विकीच्या लूकबद्दल बोलताना ते म्हणाले,"विकी कौशलचा एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विकी कौशल धर्मवीर संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तो खूप मेहनत घेत असून त्याने खरीखुरी दाढी वाढवली आहे".

विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. पण अद्याप या सिनेमाचं नाव समोर आलेलं आहे. 'छावा' असे या सिनेमाचे नाव असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या सिनेमात विकी कौशलसह बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकू शकतात. या सिनेमातील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अनिल कपूर यांना विचारणा झाल्याची चर्चा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com