Gadar 2
Gadar 2Team Lokshahi

'चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच का खराब करती' अमिषाच्या पोस्टवर प्रेक्षक नाराज

अभिनेत्री अमिषा पटेल हिने गदर-2 चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची चर्चा होताना दिसत आहे.
Published by  :
Sagar Pradhan

अभिनेता सनी देओलचा आणि अभिनेत्री अमिषा पटेलचा यांचा गदर-2 या चित्रपटाची सध्या सर्वत्र प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट आता लवकरच प्रक्षेकांच्या भेटीस येणार आहे. त्यातच या चित्रपटातील ‘उड जा काले कावा’ हे गाणं काल (29 जून) प्रेक्षकांच्या भेटीस आले. गदर- 2 चित्रपटातील या गाण्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. दरम्यान आता चित्रपटाची अभिनेत्री अमिषा पटेल हिने चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची चर्चा होताना दिसत आहे.

काय आहे नेमकं 'त्या' पोस्टमध्ये?

गदर 2 चित्रपटाच्या टीझरमधील एका सीनचा फोटो शेअर करत त्यावर तिने कॅप्शन दिलं, त्यात ती म्हणाली, नमस्कार माझ्या सर्व प्रिय चाहत्यांनो! गदर 2 मधील या शॉटबद्दल तुमच्यापैकी बरेच जण चिंतेत आहेत आणि चिंतेत आहेत की ही सकीना आहे जी मेली आहे!!! बरं ते नाही!! ती कोण आहे हे मी सांगू शकत नाही पण ती सकीना नाही! तर काळजी करू नका !! अशी माहिती तिने दिली.

काय म्हणाले चाहते?

अमिषाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर प्रेक्षकांनी त्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रेक्षकांनी अमिषाच्या त्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातला एक प्रेक्षक म्हणाला की, तू चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच का खराब करती, सकीनाचे काहीतरी चुकले असेल या अपेक्षेने लोक गेले असतील, आता तू स्पॉयलर आऊट देऊन प्रेक्षकांना नाराज केले आहेस, किंवा तू फक्त बडबड करत आहेस. असे म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com