Viral Video | पहा पंकज त्रिपाठी यांचा नवा देशी अंदाज

Viral Video | पहा पंकज त्रिपाठी यांचा नवा देशी अंदाज

Published by :
Published on

दमदार अभिनय आणि कमालीच्या आत्मविश्वासाच्या बळावर पंकज त्रिपाठी यांनी बॉलिवूडसोबतच वेब विश्वातही आपली वेगळी छाप सोडली. असा हा अभिनेता आता ज्या अंदाजात दिसत आहे, त्याचा तो अंदाज प्रेक्षकांनी कधीही पाहिला नसावा.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये ते चक्क ढोलक वाजवताना दिसत आहेत. शशी समदनं शेअर केलल्या एका व्हिडीओमध्ये त्रिपाठी यांची ही वादनाची कलाही सर्वांची मनं जिंकून जात आहे.

रुपेरी पडदा असो किंवा मग वेब सीरिज, पंकज त्रिपाठी यांनी आतापर्यंत गँगस्टर आणि काही नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. कुठे ते काळजी करणाऱ्या वडिलांच्या भूमिकेतही दिसते. पण, प्रेक्षकांसमोर येणाऱ्या त्यांच्या या रुपाच्या अतिशय वेगळी अशी त्यांची खऱ्या आयुष्यातील प्रतिमा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com